सीईओ शिंदेनी साधा मेसेजही केला नाही

Foto
खा. डॉ. भागवत कराड यांचा संताप
कोरोना रुग्णांवर महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार करावेत, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वारंवार करण्यात आली. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांना निवेदन दिले तरीही या योजनेत कोरोना रोगाचा समावेश झाला नाही. परवाच योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. मात्र लोकप्रतिनिधींना साधा मेसेजही केला नाही, अशा शब्दात खा. डॉ. भागवत कराड यांनी  आपला संताप केला. ते सांजवार्ताशी बोलत होते. 
कोरोना साथीचे जवळपास चार महिने झाले आहेत. या परिस्थितीत हजारो सर्वसामान्य नागरिकांना या रोगाने ग्रासले आहे. खासगी रुग्णालयात उपचारासाठी लाखो रुपयांचा खर्च येतो. सर्वसामान्यांना तो परवडत नाही. दुसरीकडे सरकारी दवाखान्यातही गर्दी वाढल्याने उपचार दुरापास्त झाले आहेत. कोरोना रुग्णांचा महात्मा फुले जन आरोग्य योजनेत समावेश  करण्यात यावा यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी वारंवार निवेदने दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निवेदन पाठवले. विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांच्या सोबत बैठकीत विषय मांडला. तरीही अजून शासनाला जाग आलेली नाही. सरकारच्या या दुर्लक्षाचा हजारो सर्वसामान्यांना फटका बसतो आहे. सरकारने तातडीने कोरोनाचा या योजनेत करून आता समावेश करावा, अशी मागणी डॉक्टर कराड यांनी केली.
बैठकीत जिल्हाधिकार्‍यांना सांगू
जिल्हाधिकारी कार्यालयात दर सोमवारी लोकप्रतिनिधीसोबत बैठक होत असते. या बैठकीत पुन्हा एकदा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्यासमोर हा विषय आपण आग्रक्रमाने मांडणार असल्याचेही डॉ. कराड यांनी सांगितले.